
महाराष्ट्र घडविणाऱया शिल्पकारांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या चित्र प्रदर्शनातून समाजाला प्रेरणा देणाऱ्या वैभवशाली परंपरेचा गौरव करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या संत, महापुरुष, हुतात्मे आणि लोकनेत्यांचा इतिहास उलगडणाऱ्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात 21 मेपर्यंत करण्यात आले आहे.



























































