व्हॉट्सअ‍ॅपवरही जाहिराती दिसणार

यूटय़ूबप्रमाणे आता व्हॉट्सअ‍ॅपवरही जाहिराती दिसणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅपची स्वामित्व कंपनी मेटाने करोडो युसर्जचा वापर करून कमाईचे नवे साधन शोधले आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या जाहिराती अपडेट टॅबमधील स्टेटस टॅबखाली दिसतील. या जाहिराती पर्सनल चॅटमध्ये दिसणार नाहीत. व्हॉट्सअ‍ॅपने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलेय की, नव्या बदलामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर पर्सनल मेसेज पाठवण्याच्या अनुभवात काहीच बदल होणार नाही. पर्सनल मेसेज, कॉल, स्टेटस पहिल्यासारखेच असतील. जाहिराती दाखवण्यासाठी त्यांचा वापर होणार नाही. आता युजर्स आपल्या आवडत्या चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी मासिक फी भरून सब्सक्राइब करू शकतील आणि एक्सक्लुझिव्ह अपडेट्स मिळवू शकतील. उदाहरणार्थ, जर तुम्ही फूड चॅनेल फॉलो केले तर त्यातील काही कंटेंट प्रत्येकासाठी विनामूल्य असेल, परंतु काही कंटेंट फक्त त्यांनाच उपलब्ध असेल ज्यांचे सब्सक्रिप्शन आहे.

प्रमोटेड चॅनेल्स

काही प्रमोटेड यूटय़ूब चॅनेल्स असतात, तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर काही चॅनेल आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, सध्या लोक काही चॅनल्सपर्यंत पोहोचू शकत नाहीत. येत्या काही दिवसांत ऍडमिनला व्हॉट्सऍपवर आपल्या चॅनेलची जाहिरात करता येणार आहे. म्हणजे ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल.