रुक्मिणीबाई, वसंत व्हॅली, शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या डॉक्टरांना शिस्तभंगाच्या नोटिसा; ढिसाळ कारभार सुधारण्याची केडीएमसी आयुक्तांची तंबी

कल्याणमधील पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दोन महिन्यांपूर्वी रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकारानंतर आयुक्त अभिनव गोयल यांनी कडक पावले उचलत रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टरांसह सहा कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले होते. मात्र एवढा मोठा धक्का बसूनही पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामकाजात सुधारणा होत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. रुक्मिणीबाई रुग्णालय, वसंत व्हॅली, शास्त्रीनगर रुग्णालयातील ढिसाळ कारभार सुधारण्याची तंबी आयुक्तांनी येथील डॉक्टरांना दिली आहे.

अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी अचानक हॉस्पिटलना भेटी दिल्या. यावेळी रुग्णालयांतील रात्रपाळीमध्ये सर्व कर्मचारी हेबाह्य स्त्रोत विभागातील असल्याचे निरीक्षणात आले. एकही कायमस्वरुपी पालिका कर्मचारी उपस्थित नव्हता. यासोबतच अपघात विभागातील वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित होते. तर एका कर्मचाऱ्याने अर्धवट कपडे परिधान करून रात्रपाळी केली असल्याची धक्कादायक बाबदेखील निदर्शनास आली. तिन्ही रुग्णालयांमध्ये नियंत्रणाचा अभाव दिसून आला. यामुळे रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या डॉ. शोभना लावणकर, वसंत व्हॅली रुग्णालयाच्या डॉ. सपना रामुळे आणि शास्त्रीनगर रुग्णालयाचे डॉ. योगेश चौधरी या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना 48 तासांच्या आत खुलासा देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

सरप्राईज व्हिजीट
काही दिवसांपूर्वी मध्यरात्री महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड आणि वैद्यकीय विभागाचे उपायुक्त प्रसाद आरोग्य बोरकर यांनी अचानक कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालय, वसंत व्हॅली रुग्णालय आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर पाहणी केली. यावेळी रुग्णालयात डॉक्टर साध्या वेशात रुग्णालयात दाखल झाले होते. पाहणी दरम्यान तिन्ही रुग्णालयांमध्ये गंभीर त्रुटी आणि शिस्तभंग आल्याने प्रशासनाने डॉक्टरांना कारणे बजावली आहे. आढळून संबंधित मुख्य दाखवा नोटीस