
मुंबईसह कोकणात पुढील 24 तासांत तुफान पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत मुळधार पावसाचा अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
18/06: IMD मॉडेल नुसार,पुढील २४ तासांत मुंबईसह,उ.कोकणात व आसपास पाऊस वाढण्याची शक्यता.उपग्रह निरीक्षण आता उ.कोकणच्या किनाऱ्यापासून NE & EC अरबी समुद्रावर पसरलेले ढग दिसत आहेत.#मुंबई_ठाणे येथे ७०-१३० मिमी पाऊस पडू शकतो व अधूनमधून जोरदार पाऊस. #रायगड जिल्ह्यावर लक्ष ठेवण्याची गरज. pic.twitter.com/Yph86xvnzg
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 18, 2025
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांत मुंबईसह, उत्तर कोकणात आणि आसपास पाऊस वाढण्याची शक्यता आहे. उपग्रह निरीक्षणानुसार आता उत्तर कोकणच्या किनाऱ्यापासून अरबी समुद्रावर ढग पसरलेले दिसत आहेत. मुंबई, ठाणे येथे 70-130 मिमी पाऊस पडू शकतो आणि अधूनमधून जोरदार पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.