जुलैपासून बँकिंग सिस्टम आणखी वेगवान नवीन एनएसीएच 3.0 सिस्टम लागू होणार

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ची नवीन एनएसीएच सिस्टम 3.0 जुलै 2025 पासून लागू केली जाणार आहे. या नव्या सिस्टिममुळे नोकरदारांचा पगार, ईएमआय, सबसिडीसारखे बँकिंग ट्रान्झॅक्शन आणखी वेगवान आणि सुरक्षित होणार आहेत. नव्या फिचर्समध्ये यूजर्सला इंटरफेस, रियल टाइम अलर्ट, मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि ट्रान्झॅक्शन मर्यादा या सर्व बाबींचा युजर्सला चांगला अनुभव मिळणार आहे. एनएसीएच ही देशात बँक ते बँक देवाणघेवाण करण्यासाठी एक मजबूत आणि ऑटोमेटेड सिस्टिम आहे. याद्वारेच महिन्याचा पगार, पेन्शन, सबसिडी, कर्जाचा ईएमआय, नियमित पेमेंट करायला सोपे बनवते. म्युच्युअल फंडचा एसआयपी, नेटफ्लिक्ससारख्या अॅप्सचे ऑटो पेमेंट्स याच सिस्टिमवर अवलंबून असतात. एनएसीएच 3.0 व्हर्जन सिक्योरिटी आणि फंक्शनल सुरक्षेसोबत येते. या नव्या सिस्टिममुळे युजर्सचा अनुभव आणखी चांगला होईल. डेटा प्रोटेक्शन आणि सिक्योरिटी आणखी मजबूत होईल. नव्या सिस्टिममुळे बँकेच्या एकाच स्क्रीनवर सर्व आवश्यक डिटेल्स पाहायला मिळतील. नवीन सिस्टिममुळे डेटाची सुरक्षा, ट्रान्झॅक्शनवर देखरेख आणि अनधिकृत ऍक्सेसला रोखणे हे महत्त्वाचे काम केले जाईल. नव्या सिस्टिममुळे आता बँकिंगसाठी ट्रान्झॅक्शन प्रोसेस करणे आणखी वेगवान होणार आहे.