
अहमदाबादमधील भीषण विमान दुर्घटनेनंतर डीजीसीए अर्थात नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अॅक्शन मोडवर आले आहे. विमान उड्डाण नियमांचे वारंवार उल्लंघन होत राहिले तर परवाना रद्द करण्याचा किंवा परत घेण्याचा इशाराच आज डीजीसीएने एअर इंडियाला दिला आहे. दरम्यान, या प्रकरणी आतापर्यंत डीजीसीएने एअर इंडियाला त्यांच्या तीन अधिकाऱयांना क्रू डय़ुटी शेडय़ुल्ड आणि रोस्टरसंबंधीत जबाबदाऱयांवरून हटवण्याचे आदेश दिले.