
जम्मूच्या बक्षी नगरमध्ये एका चोराला पकडल्यानंतर पोलिसांनी त्याला बुटांचा हार घालून त्यांच्या गाडीच्या बोनेटवर बसवले. त्यानंतर या चोराची रस्त्यावरुन मिरवणूक काढली. चोराचा शर्ट फाटलेला होता तसेच, तो दारूही प्यालेला होता. पकडण्यात आलेला हा चोर एका चोरट्यांच्या टोळीचा सदस्य असल्याचे समजते. या चोराची ओळख पटवण्याचे काम त्याने चाकूहल्ला केलेल्या एका व्यक्तीने केली होती. सर्वात आधी स्थानिक तरुणांच्या मदतीने पकडलेल्या या चोराला चांगलाच चोप देण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याची शर्ट अंगावर नसताना त्याची धिंड काढली. या महिन्यात जम्मूमध्ये गुन्हेगारांसोबत घडलेली ही दुसरी घटना आहे.
मंगळवारी जम्मू विभागातील बक्षी नगरमध्ये एका चोराला पकडण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी या चोराला बुटांचा हार घालून, त्याला पोलिस वाहनाच्या बोनेटवर बसवून धिंड काढली. सदर घटनेची माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी या चोराला पकडण्यात आले होते. या चोराला पकडल्यानंतर त्याला बुटाचा हार घालून, त्याची बोनेटवर बसवून धिंड काढण्यात आली.
बक्षी नगर पोलिस स्टेशनचे एसएचओ आझाद मनहास म्हणाले की, आरोपी कुख्यात गुन्हेगार एका टोळीचा सदस्य आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, काही दिवसांपूर्वी रुग्णासाठी औषधे खरेदी करताना 40 हजार रुपये लुटण्यात आलेल्या एका व्यक्तीने चोराला ओळखले. परंतु चोराने या व्यक्तीवर व्यक्तीवर चाकूने हल्ला केला. या झटापटीत संबंधित व्यक्तीच्या हाताला दुखापत झाली आणि चोराचा शर्ट फाटला गेला.
परंतु झालेल्या या घटनेमुळे आता पोलिस चांगलेच वादात सापडले आहेत. पोलिसांनी चोराची बोनेटवर बसवून काढलेली ही धिंड आता सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. त्यामुळेच या घटनेचा आणि कृतीचा निषेध व्यक्त होत आहे. पोलिसांनी चोराला दिलेली ही वागणूक गैर असल्याचे, म्हटले जात आहे. त्यामुळेच आता या घडलेल्या घटनेची चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.