
पाकिस्तानी सैन्याच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मेजर मुईझ असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे. मेजर मुईझ याची दक्षिण वझिरीस्तानमध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. मेजर मुईझ यांची हत्या ही पाकिस्तानी सैन्यासाठी मोठा धक्का आहे.
पाकिस्तानी सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, मेजर मुईझ हे सहाव्या कमांडो बटालियनमध्ये तैनात होते. यावेळी सरगोगाजवळ दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी मुईझवर हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान मुईझचा मृत्यू झाला. मेजर मुईझ व्यतिरिक्त दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैन्याचे लान्स नायक जिब्रानउल्लाह यांनाही ठार मारले आहे. यापूर्वीही या भागात झालेल्या ऑपरेशनमध्ये 11 दहशतवादी मारले गेले होते.
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये बमविरोधी पथकावर हल्ला, पाच जणांचा मृत्यू
2019 मध्ये हिंदुस्थानच्या-पाकिस्तानविरुद्धच्या लढाईदरम्यान मुईझ प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्यावेळी मुईझने हिंदुस्थानचे विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा केला होता. मेजर मुईझ मूळचा पाकिस्तानातील चकवालचा रहिवासी होता. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मुईझच्या हत्येवर शोक व्यक्त केला आहे.
पाकिस्तानात ट्रम्प यांच्या क्रिप्टो करन्सी व्यवसायाची जबाबदारी मुनीर यांच्यावर