
इस्लामाबाद – दक्षिण वझिरिस्तानमध्ये तहरीक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचा मेजर रँक अधिकारी मोईज अब्बास ठार झाला. मोईज अब्बास या पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱयाने फेब्रुवारी 2019 मध्ये हिंदुस्थानी हवाई दलाचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा केला होता. दरम्यान, दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 11 टीटीपी दहशतवादीही मारले गेले तर 2 सैनिक ठार झाल्याचा दावा पाकिस्तानी सैन्याने केला आहे.
पाकिस्तानला एशियन विकास बँकेचे कर्ज
इस्लामाबाद – देशात महिलांच्या आर्थिक सुधारणेला चालना मिळावी तसेच देशाची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी पाकिस्तानला एशियन विकास बँकेने तब्बल 350 अमेरिकन डॉलरचे कर्ज दिले आहे. पाकिस्तान सरकारने या कर्जासाठीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. महिला सक्षमीकरण आर्थिक धोरण कार्यक्रमांतर्गत पाकिस्तान सरकारला कर्ज देण्यात आल्याचे वृत्त रेडिओ पाकिस्तानने दिले आहे.