उत्तर कोरियात बीच रिसोर्ट

उत्तर कोरियाचे नेता किम जोंगने पूर्व किनाऱयावर आलिशान रिसोर्ट सुरू केलंय. वॉनसन कलमा असे बीच रिसोर्टचे नाव आहे. त्यामध्ये 54 रेस्टॉरंट, सिनेमा, इनडोअर, आऊटडोअर वॉटरपार्क, गोल्फ कोर्स, मुव्ही थिएटर, शॉपिंग मॉल, बियर पब, समुद्र स्नान आणि अन्य सुविधा उपलब्ध असतील. किम जोंगने आपल्या कुटुंबीयांसमवेत या रिसोर्टचा प्रसार केला. यावेळी किम जोम नेहमीपेक्षा वेगळ्या वेशभूषेत म्हणजे सुटाबुटात आणि टाय लावून दिसला. देशातील धनवान वर्गाचे खासगी व्हिला या जागी आहेत. तसेच पूर्वी मिसाईल परीक्षणासाठीही जागा वापरली जायची. वॉनसन कलमा रिसोर्टचे काम 2018 साली सुरू झाले होते.