
आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणारच, असा निर्धार भायखळा विधानसभेच्या वतीने आयोजित मेळाव्यात शिवसैनिकांनी व्यक्त केला. या मेळाव्याला मोठय़ा संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती होती.
पालिका निवडणुकीचा पूर्वतयारीसाठी भायखळा विधानसभेच्या वतीने उपशाखाप्रमुख आणि गटप्रमुखांच्या निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना उपनेते आणि भायखळा विधानसभा निरीक्षक अशोक धात्रक, शिवसेना उपनेते आणि भायखळा विधानसभेचे आमदार मनोज जामसुतकर यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, सुधीर साळवी, शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दगडू सकपाळ, आमदार अजय चौधरी, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. पालिका निवडणुकीत भायखळा विधानसभेतील सर्वच जागांवर शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणून त्या प्रभागांवर भगवा फडकविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
विधानसभा समन्वयक बबन गावकर, विधानसभा संघटक मंगेश बनसोड, उपविभागप्रमुख राम सावंत, विजय कामतेकर, माजी नगरसेवक रमाकांत रहाटे, उपविभाग संघटक सोनम जामसुतकर, विधानसभा समन्वयक सुरेखा राऊत, विधानसभा संघटक चंदना साळुंखे, उपविभाग संघटक कीर्ती शिंदे यांच्यासह विभागातील पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.