Diogo Jota – लिव्हरपूलच्या स्टार फुटबॉलपटूचा भीषण कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

फुटबॉल जगतातील एक दु:खद बातमी आली आहे. पोर्तुलागचा स्टार खेळाडू आणि लिव्हरपूल या आघाडीच्या क्लबचे प्रतिनिधित्व करणारा फुटबॉलपटू डिओगो जोटा (वय – 28) याचा भीषण कार अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. यामुळे क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्पेनच्या जमोरा प्रांतातील ए-52 रोडवर हा अपघात झाला. लँबोर्गिनी कारमधून तो आपला भाऊ आंद्रे सिल्वा याच्यासोबत जात होता. स्थानिक वेळेनुसार रात्री साडे बारा वाजता एका गाडीला ओव्हरटेक करताना लँबोर्गिनी कारचे टायर फुटले आणि कारला भीषण आग लागली. या आगीत होरपळल्याने डिओगो जोडा आणि त्याचा भाऊ आंद्रे सिल्वा (वय – 26) याचा मृत्यू झाला.

10 दिवसांपूर्वी झालेलं लग्न

डिओगो जोटा याचे 10 दिवसांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. 22 जून रोजी त्याने प्रियसी रुटे कार्डोसो हिच्याशी लग्न केले होते. दोघे बऱ्याच वर्षांपासून एकत्र रहात होते. दोघांना तीन मुलंही आहेत. लग्नाचे फोटोही त्याने नुकतेच आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले होते.

डिओगो जोटा लिव्हरपूल संघात तो फॉरवर्डला खेळायचा. गेल्या हंगामात लिव्हरपूरला प्रिमियर लीगचे विजेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच त्याआधी जून महिन्यात पोर्तुगालला नेशन्स लीगची फायनल जिंकून देण्यातही त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.

दरम्यान, डिओगो जोटा हा वॉल्वरहॅम्प्टन वाँडरर्सला सोडून लिव्हरपूलकडे आला होता. यासाठी लिव्हरपूलने 40 मिलियन पाऊंडची रक्कम मोजली होती. मधल्या काळात लिव्हरपूरलने एफए कप आणि लीग कपही जिंकला होता. डिओओ हा एक आक्रमक खेळाडू होता. फॉरवर्ड आणि विंगर अशा दोन्ही पोझिशनवर तो खेळू शकत होता.