
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी (2 जुलै 2025) राजधानी कोलंबोमध्ये खेळला गेला. वानिंदु हसरंगाने आपल्या फिरकीच्या जाळ्यात बांगलादेशींना अचूक टिपलं आणि श्रीलंकेने मालिकेची विजयी सुरुवात केली. मात्र, हा सामना कोणत्या खेळाडूमुळे नाही तर चक्क एका सापामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. चालू सामन्यात सापाने मैदानात एन्ट्री मारल्यामुळे सामना काही मिनिटांसाठी थांबवावा लागला होता.
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना सर्व गडी बाद 244 धावा करत बांगलादेशला जिंकण्यासाठी 245 धावांच आव्हान दिलं होतं. चरीथ अलसंकाने या सामन्यात दमदार फलंदाजी करत 106 धावांची खेळी केली. परंतु आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशची श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भंबेरी उडवली. बांगलादेशचे फलंदाजी फलंदाजीसाठी आले आणि तिसऱ्याच षटकात सापाने मैदानात प्रवेश केला. सापाने अचानक मैदानात प्रवेश केल्यामुळे खेळाडू घाबरल्याने काही मिनिटांसाठी सामना थांबवावा लागला होता. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सापाला मैदानाबाहेर काढलं आणि त्यानंतर सामना सुरू झाला. सापाला बाहेर काढल्यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी बांगलादेशला अवघ्या 167 धावांमध्येच गुंडाळलं आणि 77 धावांनी सामना आपल्या खिशात घातला.
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी (2 जुलै 2025) राजधानी कोलंबोमध्ये खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशची फलंदाजी सुरू असताना सापाने मैदानात एन्ट्री मारल्यामुळे सामना काही मिनिटांसाठी थांबवण्यात आला होता. pic.twitter.com/WdSNIwF87O
— Saamana Online (@SaamanaOnline) July 3, 2025