
ज्येष्ठ अभिनेते, निर्माते धीरज कुमार यांचे निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना न्युमोनिया झाला होता. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. धीरज कुमार यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.
अभिनेते धीरज कुमार यांनी ‘हीरा पन्ना’, ‘शिर्डी के साईबाबा’, ‘सरगम’, ‘मांग भरो सजना’, ‘क्रांती’, ‘पुराण मंदिर’, ‘कर्म युद्ध’ यासारख्या अनेक चित्रपटांत काम केले. त्यानंतर त्यांनी क्रिएटिव्ह आय या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली निर्माता-दिग्दर्शक म्हणून टीव्ही इंडस्ट्रीत प्रवेश केला. त्यांनी ‘ओम नमः शिवाय’, ‘श्री गणेश’, ‘मिली’, ‘घर की लक्ष्मी बेटिया’, ‘मन में है विश्वास’, ‘ये प्यार ना होगा कम’, ‘तुझ संग प्रीत लगाई सजना’, ‘नादनिया’ आणि ‘इश्क सुभान अल्लाह’ यांसारख्या उत्कृष्ट टीव्ही शोची निर्मिती केली.