बलुच आर्मीचा पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला; सैनिकांना घेऊन जाणारी बस IED स्फोटानं उडवली, 29 ठार

बलुचिस्तानमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) पाकिस्तानी सैन्यावर जोरदार हल्ले करत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बलुच लिबरेशन आर्मीने कलात आणि क्वेटामध्ये दोन वेगवेगळी ऑपरेशन राबवत पाकिस्तानच्या 29 सैनिकांना ठार मारले. स्वातंत्र्य मिळेपर्यंत पाकिस्तानी सैन्याला ही किंमत चुकवावी लागणार, असा इशाराही बलुच आर्मीने दिला आहे.

बलुच लिबरेशन आर्मीने एक निवेदन जारी करत म्हणले की, क्वेटा येथे बीएलएचे विशेष पथक फतह स्क्वाडने पाकिस्तानी सैनिकांना घेऊन जाणाऱ्या बसला आयईडी स्फोटाने उडवले. खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. ही बस कराचीहून क्वेटाच्या दिशेने निघालेली होती. बीएलएने केलेल्या हल्ल्यात 27 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला, तर अनेक गंभीर जखमी झाले.

्

दरम्यान, या बसमध्ये काही कव्वाली गायकही होते. हे गायक आमच्या निशाण्यावर नव्हते असेही बीएलएने स्पष्ट केले आहे. बीएलएने कलात हजार गांजी भागात आयईडी स्फोट घडवून आणला आणि दोन सैनिकांना ठार मारले. कलात आणि क्वेटामध्ये मिळून बीएलएने पाकिस्तानच्या 29 सैनिकांना ठार मारले. तसेच पाकिस्तानी सैन्याच्या अड्ड्यांचेही नुकसान केले.

दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीने घेतली आहे. पाकिस्तानी सैन्याविरोधात युद्ध सुरुच राहील आणि जोपर्यंत बलुचिस्तान स्वातंत्र्य होत नाही तोपर्यंत पाकिस्तानी सैन्याला किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही बीएलएने दिली.