ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप्सचे प्रमोशन; प्रकाश राज, राणा दग्गुबत्ती यांच्यासह चौघांना ईडीचे समन्स

बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंग आणि जुगाराशी संबंधित अॅप्सचे प्रमोशन केल्या प्रकरणी ईडीने राणा दग्गुबत्ती, प्रकाश राज, विजय देवरकाsंडा आणि लक्ष्मी मंचू या चार दाक्षिणात्य अभिनेत्यांना समन्स बजावले आहे.

राणा दग्गुबत्तीला 23 जुलै रोजी प्रकाश राजला 30 जुलै तर विजय देवरकाsंडाला 6 ऑगस्ट आणि लक्ष्मी मंचूला 13 ऑगस्ट रोजी हैदराबाद झोनल ऑफिसमध्ये हजर राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत अधिकाऱयांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार मनी लॉण्डरिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार एजन्सीसमोर हजर झाल्यानंतर सर्वांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. ईडी पीएमएलए कायद्या अंतर्गत सर्वांची चौकशी करणार आहे. पाच राज्यांच्या पोलीस एफआयआरची दखल घेत ईडीने हा गुन्हा दाखल केला आहे. या स्टार्स मंडळींनी प्रमोट केलेले अॅप्स ऑनलाईन बेटिंग आणि जुगाराद्वारे बेकायदेशीरपणे कोटय़वधी रुपये कमवत होते, असा आरोप आहे.