खडकवासला मतदारसंघ, मशीनमधील मतदान स्लिप गहाळ झाल्याचा आरोप

खडकवासला विधानसभा मतदारसंघातील फेर मतमोजणी प्रक्रियेत व्हीव्हीपॅट मशीनमधील वोटर स्लिप गहाळ झाल्याचा आक्षेप घेत खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार सचिन दोडके यांनी मतमोजणी प्रक्रिया दरम्यान केला. मॉकपोल करताना जो निकाल इरेज होतो, तो इरेज करू नये, असे दोडके यांनी सांगितले होते. ते मान्य करून निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार निवडणूक प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावा निवडणूक अधिकाऱdयांनी केला. तथापि, फेरमतमोजणीतही दोडके यांनी असमाधान व्यक्त केले.

भोसरी येथील वखार महामंडळाच्या गोदामामध्ये ही फेर मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. फेर मतमोजणी दरम्यान दोन ईव्हीएम मशीन मधील मतांची पडताळणी करण्यात आली. या मशीनमधील सर्व आकडे जुळले. तसेच सील केलेल्या मशीनवरील तपशील दाखवण्यात आला तो देखील मतमोजणीच्या वेळी होतात त्याप्रमाणेच असल्याचे दिसून आले.