उपराष्ट्रपती पदासाठी 9 सप्टेंबरला निवडणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे उपराष्ट्रपती पद रिक्त झाले आहे. या पदासाठी 9 सप्टेंबरला निवडणूक होणार असल्याची घोषणा केंद्रिय़ निवडणूक आयोगाने केली आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा अचानक राजीनामा दिला. धनखड यांच्या राजीनाम्यानंतर नवे उपराष्ट्रपती कोण? यासाठी निवडणूक कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आता केंद्रिय़ निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला. या कार्यक्रमानुसार 9 सप्टेंबर रोजी मतदान पार पडणार आहे.

असे आहे निवडणुकीचे वेळापत्रक

निवडणुकीची 7 ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी होईल.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट.

उमेदवारी अर्जाची छाननीची तारीख 22 ऑगस्ट.

उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट.