
दंड ठोकणार असाल तर मी आरटीओ कार्यालयालाच टाळे ठोकेन, अशी धमकी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी दिली. बांगर यांनी आरटीओ अधिकाऱयाला धमकावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱया ऑटोला आरटीओ अधिकाऱयाने मोठय़ा प्रमाणात दंड ठोठावला होता. यासंदर्भात ऑटोचालकांनी केलेल्या तक्रारीवरून आमदार बांगर यांनी आक्रमक भूमिका घेत आरटीओ अधिकाऱयाला पह्न करून चांगलेच झापले. अशा पद्धतीने दंड ठोकणार असाल तर मी आरटीओ कार्यालयाला टाळे ठोकेन, असा सज्जड दम संतोष बांगर यांनी दिला.