
परिणय फुके यांना तर लोक मुख्यमंत्री समजतात. माझ्यासोबत राहत असल्याने लोकांना माहीत आहे की ते मुख्यमंत्र्यांची गुरुकिल्ली आहे त्यांच्याकडे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गोवा येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन पार पडले. या वेळी उपस्थितांनी भाजप आमदार परिणय फुके यांना मंत्रीपदावर संधी देण्याची मागणी केली. त्यावर फडणवीस म्हणाले, अनेक लोक त्यांना मुख्यमंत्री समजतात आणि तुम्ही त्यांचे डिमोशन करायला निघाले. त्यांची लोकप्रियता हीच त्यांच्या कार्याची साक्ष आहे, असे सांगत फुके यांना भविष्यात मंत्रीपदी संधी देण्याचे संकेत फडणवीस यांनी दिले.