कॅनडात 4 वर्षांत 1203 हिंदुस्थानींचा मृत्यू

2020 ते 2024 या चार वर्षांत कॅनडामध्ये राहणाऱ्या एकूण 1203 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली. विदेश राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. ज्या 1203 हिंदुस्थानी व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये काही मृत्यू हे वृद्धावस्था, आरोग्याच्या कारणामुळे, दुर्घटना, आत्महत्या, हिंसाचार आणि हत्या या सर्वांचा समावेश आहे. 2020 मध्ये 120, 2021 मध्ये 160, 2022 मध्ये 198, 2023 मध्ये 336, 2024 मध्ये 389 जणांचा मृत्यू झाला आहे.