
दर महिन्याला 55 हजार रुपये घराचे भाडे देणाऱ्या एका भाडेकरूला आयकर विभागाच्या नियमाकडे दुर्लक्ष करणे चांगलेच भोवले आहे. आयकर विभागाने त्या भाडेकरूवर 1 लाखांचा दंड ठोठावला आहे. अभिषेक असे या भाडेकरूचे नाव असून तो टीडीएससंबंधी चालान आणि रिटर्न स्टेटमेंट दाखल करायला विसरला होता. आयकर विभागाच्या नियमानुसार, जर कोणताही व्यक्ती 50 हजारांहून अधिक भाडे देत असेल, तर त्यावर 2 टक्के टीडीएस कापणे बंधनकारक आहे. तसेच भाडेकरूने फॉर्म 26 क्यूसी भरणे आवश्यक आहे, तर फॉर्म 16 सी घर मालकाने द्यायचा असतो. हे टीडीएस प्रमाणपत्र असते. जर टीडीएस वेळेवर कापला नाही, तर 10 हजार ते 1 लाखांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो.