साप्ताहिक राशिभविष्य – 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2025

>> निलीमा प्रधान

मेष – आळस दूर ठेवा
मेषेच्या पंचमेषात सूर्य, शुक्र गुरू युती. सप्ताहाच्या सुरूवातीला बोलताना सावध रहा. कायद्याला झुगारून देण्याचे धाडस महागात पडेल. नोकरीमध्ये कामाचा व्याप वाढेल. प्रभाव टिकवण्याची जिद्द ठेवा. धंद्यात आळस नको. वसुली करा. लाभ मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कारस्थाने वाढतील. विरोधक वितंडवाद करतील. सहनशीलता बाळगा.
शुभ दि. 15, 16

वृषभ – गैरसमज उद्भवतील
वृषभेच्या सुखस्थानात सूर्य, चंद्र बुध त्रिकोणयोग. मैत्रीत, नात्यात गैरसमज तणाव, वाद होतील. पोटाची काळजी घ्या. नोकरीमध्ये आळस नको. स्पर्धा करणार्यांना कमी लेखू नका. धंद्यात लाभ होतील. नवा निर्णय लांबणीवर टाका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची कामे करा. वेळेला महत्व द्या. उतावळेपणा दूर ठेवा.
शुभ दि. 10, 11

मिथुन – परिचय उत्साह वाढवतील
मिथुनेच्या पराक्रमात सूर्य, शुक्र गुरू युती. धाडस, आत्मविश्वास वाढेल. नविन परिचय उत्साहवर्धक ठरतील. कठीण कामे करून घ्या. कला, क्रिडा, साहित्यात प्रशंसा होईल. नोकरीत प्रगती, बढती, बदल शक्य. धंद्यात राग न ठेवता व्यवहाराकडे लद्वा द्या. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संबंध सुधारतील. नव्याने एकत्र काम कराल.
शुभ दि. 10, 11

कर्क – करारात फसगत टाळा
कर्केच्या धनेषात सूर्य, चंद्र मंगळ प्रतियुती. कुणाच्याहा गोड बोलण्याला बळी पडू नका. व्यवहारात, करारात फसगत टाळा. व्यसन, मोह नुकसानकारक ठरेल. नोकरीत प्रयश्न सोडवता येतील. धंद्यात हिशेब तपासा. अर्हकार नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रश्न किचकट होतील. प्रतिष्ठा जपा. वरिष्ठांना दुखवू नका.
शुभ दि. 12, 14

सिंह – अहंकार दूर ठेवा
स्वराशीत सूर्यग, शुक्र गुरू युती. सोपा वाटणारा प्रश्न अचानक चिघळण्याची शक्यता आहे. नम्रपणा, सहनशीलता ठेवा. चर्चा करण्यात अहंकार नको. नोकरीत वरिष्ठांचा कल पाहून मगच बोला. धंद्यात मोठेपणा नको, चातुर्य हवे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक दुरावलेले नेते, सहकारी नव्याने संबंध साधतील.
शुभ दि. 15, 16

कन्या – किचकट प्रश्न मार्गी लागतील
कन्येच्या व्ययेषात सूर्य, शुक्र गुरू युती. सप्ताहाच्या सुरुवातीला किचकट प्रश्न मार्गी लावा. रागाचा पारा वाढवण्याचा प्रयत्न इतर व्यक्ती करतील. धंद्यात वाढ होईल. रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. नोकरीमध्ये कठीण काम करून दाखवाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या वागण्यात बदल झाल्याने तुमची कोंडी होईल.
शुभ दि. 12, 13

तूळ – नोकरीत प्रगती होईल
तुळेच्या एकादशात सूर्य, शुक्र गुरू युती. राग आवरा. दुखापत टाळा. प्रयत्नाने यश खेचता येईल. नम्रता, गोड बोलणे यावर धंद्यात बाजी माराल. नोकरीत प्रगती होईल. दगदग, ताण जाणवेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात समोरच्या व्यक्ती डावपेच टाकतील. सौम्य धोरण ठेवा. शह देण्याची संधी शोधा. प्रतिष्ठा, लोकप्रियता वाढवा.
शुभ दि. 10, 15

वृश्चिक – गैरसमज उद्भवतील
वृश्चिकेच्या दशमेषात सूर्य, चंद्र बुध त्रिकोणयोग. सप्ताहाच्या शेवटी गैरसमज उद्भवतील. नाराजी होईल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागावे लागेल. मनस्वास्थ्य बिघडेल. संयम बाळगा. धंद्यात फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मित्रपक्षासमवेत वाद होतील. संशयाचे बीज रोवले जाईल. प्रतिष्ठा जपा.
शुभ दि. 12, 13

धनु – समस्या त्वरित सोडवाल
धनुच्या भाग्येषात सूर्य, शुक्र गुरू युती. कोणतीही समस्या त्वरित सोडवता येईल असे गृहित धरू नका. वरिष्ठांना कमी लेखू नका. घरगुती वाटाघाटीत भूमिका घ्यावी लागेल. नोकरीमध्ये इतरांना मदत करूनही तणाव राहील. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे योग्य मुद्दे विचारात घेण्यास विलंब लागेल.
शुभ दि. 10, 15

मकर – नोकरीत महत्त्व राहील
मकरेच्या अष्टमेषात सूर्य, चंद्र बुध त्रिकोणयोग. महत्त्वाची, कठीण कामे याच सप्ताहात पूर्ण करा. मैत्री वाढवणारी व्यक्ती कोण आहे हे नीट तपासा. अनुभवी, थोर व्यक्तीचा सल्ला घ्या. निश्चित धोरण ठरवण्याची घाई नको. नोकरीत महत्त्व राहील. धंद्यात नुकसान होईल. सतर्क रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठ तुमच्याकडून सहकाराची अपेक्षा ठेवतील.
शुभ दि. 10, 11

कुंभ – अहंकार दूर ठेवा
कुंभेच्या सप्तमेषात सूर्य, शुक्र गुरू युती. उत्सह, आत्मविश्वास वाढेल. तुमची स्तुती करून, गोड बोलून गुपित काढण्याचा प्रयत्न होईल. विरोधकांना कमी लेखू नका. नोकरीत दगदग होईल. वाद टाळा. अहंकार ठेऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चर्चेत गैरसमज, तणाव निर्माण होईल. तटस्थ रहा. अभ्यास करून ठेवा. कायदा पाळा.
शुभ दि. 15, 16

मीन – जास्त मोह ठेवू नका
मीनेच्या षष्ठेशात सूर्य, चंद्र बुध त्रिकोणयोग. संताप टाळा. नविन ओळख फारशी योग्य ठरणार नाही. नोकरीत कामात पुढे रहाल. धंद्यात जास्त मोह नको. नविन धोरण ठरविताना चौफेर विचार करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे वरिष्ठांना पटवून द्यावे लागतील. सहकारी, नेते यांच्याशी सलोख्याने वागा.

शुभ दि. 11, 12