
जिल्हा परिषदेच्या शाळांतील गुरुजींची हजेरी आता मोबाईल अॅपद्वारे घेतली जाणार आहे. बायोमेट्रिक प्रणालीच्या तुलनेत अधिक सुलभ, कमी खर्चिक आणि तांत्रिकदृष्टय़ा आधुनिक असलेल्या जिओफेन्सिंग तंत्रज्ञानावर आधारित हजेरी प्रणाली लवकरच राबवण्यात येणार आहे.या निर्णयामुळे शिक्षकांनी शाळेच्या निश्चित भौगोलिक क्षेत्रात (जिओफेन्स) प्रवेश केल्याशिवाय हजेरी लावता येणार नाही. यामुळे वेळेवर उपस्थित राहण्यावर भर पडेल, अनुपस्थितीचे प्रमाण कमी होईल आणि शिक्षण प्रक्रियेत शिस्तबद्धता निर्माण होईल, असा दावा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा आहे.