
>> राहूल गोखले
शास्त्रज्ञ वेगवेगळे शोध लावून मानवी जीवनास नेहेमी नवीन दृष्टी देत असतात. यांतील काही शोध हे ाढांतिकारक असतात आणि ते शोध लावणारे संशोधक-शास्त्रज्ञ हे महान ठरतात; अनेक पिढय़ांना प्रेरणा देत राहतात. डॉ सुनील विभुते यांनी या पुस्तकातून (प्रकाशक: इंडस सोर्स बुक्स) अशा जागतिक दर्जाच्या निवडक रसायनशात्रज्ञांचा परिचय करून दिला आहे. यांत 1743 मध्ये जन्मलेले आणि प्राणवायूच्या अस्तित्वाचा शोध लावणारे अँटोइन लॅव्हॉयझिये यांच्यापासून आता वयाची नव्वदी ओलांडलेले डॉ सी एन आर राव यांच्यापर्यंत दहा जणांचा समावेश लेखकाने केला आहे.
प्रत्येक प्रकरणाचा साचा हा सामन्यत त्या त्या शास्त्रज्ञाचे जीवन; कामगिरी; त्याला मिळालेले पुरस्कार; त्याने केलेले लेखन व विज्ञानाव्यतिरिक्त त्याने अन्य क्षेत्रात केलेली उल्लेखनीय कामगिरी यांचा धांडोळा असा आहे. मात्र या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे त्या शास्त्रज्ञाचे महानपण कशात दडलेले आहे याची कल्पना वाचकाला येते. लॅव्हॉयझियेने कायद्याची पदवी घेतली होती; पण त्याचा कल विज्ञान संशोधनाकडे होता अशी माहिती लेखक देतो. त्याने केवळ प्राणवायूच्या अस्तित्वाचाच शोध लावला नाही तर रासायनिक अभिािढयांच्या अभ्यासात महत्वाचे योगदान दिले; आधुनिक रसायनशात्राचे पहिले पाठय़पुस्तक त्याने लिहिले. इंग्लंडमध्ये 1766 मध्ये जन्मलेल्या जॉन डाल्टनने अणू सिद्धांत मांडला. त्याच संशोधनात त्याने पुढे काही मूलद्रव्यांच्या अणुभारांचा शोध लावून भर घातली. अणुकेंद्रीय रसायनशास्त्राची जी उतुंग इमारत उभी आहे तिचा पाया डाल्टनचा अणू सिद्धांत आहे असे लेखकाने नमूद केले आहे. आताच्या इटलीत जन्मलेल्या अव्हागाड्रोने रासायनिक अभिािढयांच्या संशोधनात एक स्थिरांक देऊन मूलभूत योगदान दिले. मात्र त्याच्या हयातीत त्याचे संशोधन उपेक्षित राहिले. त्यामागील कारणांची चर्चा लेखकाने केली आहे.
डाल्टनचे अणुभार संबंधित संशोधन पुढे नेणारे बर्झेलियस; दूध आंबू नये यासाठीची पद्धत शोधून काढणारा तसेच रेबीज लस विकसित करणारा पाश्चर; मूलद्रव्यांची आवर्तसारणी विकसित करणारा मेंडेलिव्ह यांवरील लेख वाचनीय. त्यात काही रंजक माहितीही लेखक देतो. उदाहरणार्थ मेंडेलिव्हने गुणधर्मांमधील आवर्तनांच्या आधारावर आठ नवीन मूलद्रव्यांचे भाकीत केले होते. त्यासाठीची सांकेतिक अक्षरे म्हणू संस्कृत भाषेतील शब्दांचा वापर केला होता. अशा माहितीने पुस्तकाची खुमारी वाढली आहे. पुस्तकात दोन महिला शास्त्रज्ञांचा समावेश आहे- एक म्हणजे दोनदा नोबेल पारितोषिक मिळविण्राया मारी क्युरी आणि दुस्रया भारतीय असलेल्या डॉ. असिमा चॅटर्जी. डॉ चॅटर्जी यांनी रसायनशात्रातील संशोधनाच्या आधारावर वनस्पतीतून औषधे विकसित केली. कौटुंबिक आपत्तीच्या दडपणाखाली असूनही त्यांनी आपली संशोधन चालू ठेवले. आचार्य पी सी रॉय यांचे कार्य अद्भुत. नायट्रेटयुक्त रासायनिक पदार्थांच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या संशोधनाची दखल जगाने घेतलीच; पण बंगालमध्ये औद्योगिकतेचा पाया रचण्यापासून ाढांतिकारकांना आश्रय देण्यापर्यंत बहुपेडी जीवन जगणारे रे यांचे जीवन प्रेरणादायी.
लेखकाने या शास्त्रज्ञांची प्रतिभा अधोरेखित करतानाच त्यांनी घेतलेली मेहनत; कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता निखळ व्यापक मानवी हिताचा विचार करून केलेले संशोधन; प्रसंगी आपल्या आरोग्यावर होण्राया प्रतिकूल परिणामांची न बाळगलेली तमा याकडेही लक्ष वेधले आहे. संशोधन ही वृत्ती असते; पोटार्थी व्यवसाय नव्हे. किंबहुना हे झपाटलेपणच शास्त्रज्ञांना महान बनविते याचा प्रत्यय पुस्तकातील लेख देतो. पुस्तकाला डॉ. ज्येष्ठराज जोशी यांची लाभलेली प्रस्तावना वाचनीय. अजय महाडिक यांनी तयार केलेले मुखपृष्ठ वेधक.
दहा जागतिक दर्जाचे निवडक रसायनशात्रज्ञ
लेखक : डॉ सुनील विभुते
प्रकाशक : इंडस सोर्स बुक्स
पृष्ठे : 119 मूल्य : रुपये 250