मनिका विश्वकर्मा बनली मिस युनिव्हर्स इंडिया

राजस्थानच्या जयपूरमध्ये रंगलेल्या मिस युनिव्हर्स इंडिया 2025 स्पर्धेत मनिका विश्वकर्माने बाजी मारली. मिस युनिव्हर्स इंडिया 2025 चा मुकूट मनिकाच्या माथ्यावर चढवण्यात आला. मनिका विश्वकर्मा आता 74 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत हिंदुस्थानचे नेतृत्व करताना दिसणार आहे. या स्पर्धेत एकूण 130 देशांच्या सुंदरी सहभागी होतील. मिस युनिव्हर्स इंडिया बनलेल्या मनिकाने याआधी मिस युनिव्हर्स राजस्थान 2024 चा ताजही आपल्या नावावर केलेला आहे. मनिकाने मिस युनिव्हर्स इंडियाचा मुकूट जिंकल्यानंतर अभिनेत्री आणि ज्युरी सदस्य उर्वशी रौतेला हिने मनिकाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.