
बाप्पाच्या दरबारात आता सुवासिक अगरबत्त्यांचा दरवळणार आहे. अशा अगरबत्त्यांना ग्राहकांकडून प्रचंड मागणी आहे. बाजारात आता रासायनिक घटकांचा वापर असणाऱया उत्पादनांची मागणी घटल्याचे समोर आले आहे.
स्वामी केसरीया चंदन, सुखड चंदन, पानडी या अगरबत्यांना बाजारात प्रचंड मागणी असून या अगरबत्तीचा सुवास मनाला प्रचंड भुरळ घालणारा आहे. 600 पासून ते 4 हजार रुपयांपर्यंत या नैसर्गिक अगरबत्तीच्या किमती असून या अगरबत्त्या गेल्या 40 वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असणाऱया महाराजा अगरबत्तीच्या दुकानात मिळत आहेत. या अगरबत्तीचा धूर प्रचंड नसतो, सुवास अधिक आणि नैसर्गिक तसेच शरीराला हानीकारक नसतो, अशी माहिती महाराजा अगरबत्तीचे मालक अरविंद शहा यांचा मुलगा श्रेयस शहा यांने दिली. महाराजा अगरबत्ती, रघुनाथ निवास, डी.व्ही. देशपांडे मार्ग, शिवाजी पार्क, दादर येथे या नैसर्गिक अगरबत्ती उपलब्ध आहेत.
स्वामी समर्थांच्या मठात केवडय़ाचा सुवास येतो. त्या सुगंधावर आधारीत स्वामी ही अगरबत्ती महाराजाने बाजारात आणली आहे. याशिवाय केसरीया उद आणि केसरीया चंदन या अगरबत्तीही उपलब्ध आहेत.
मोरल फ्रॅग्रन्सने मॅडोन्ना रोल ऑन, मॅग्नेटीक रोल ऑन, द ब्ल्यू रोल ऑन आणि 999 रोल ऑन या नैसर्गिक घटकापासून बनवलेल्या अगरबत्त्या बाजारात आणल्या आहेत.
वास्तुयंत्र आणि प्युअर हीना मसाला बत्ती, हरी पानडी, बपिरा मसाला बत्ती, उद वूड, बखूर नॅचरल बेस बत्ती, रिचन हनी, कॉन्फिडन्स मसाला बेस बत्ती, कश्मिरी लवेंडर आणि अंगारे उद नॅचरल बेस बत्ती या महाराजाच्या उत्पादनांना बाजारात प्रचंड मागणी आहे.