Asia Cup 2025 – पाकिस्तानसोबत खेळण्याचा BCCI चा हट्ट कायम, सूत्रांची माहिती

आशिया कप मालिकेत टीम इंडिया व पाकिस्तानमध्ये 14 सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही असे जाहीर केले होते. असे असले तरी BCCI मात्र पाकिस्तानसोबत आशिया मालिकेत खेळण्यावर ठाम असल्याचे समजते. Press Trust of India ने क्रिडा मंत्रालयाच्या सूत्राकडून ही माहिती दिली आहे. ”हिंदुस्थानी संघाला आशिया कपमध्ये खेळण्यापासून रोखता येऊ शकत नाही”, असे या सूत्रांचे म्हणने आहे.

दरम्यान गुरुवारी क्रीडा मंत्रालयाने एक पत्रक काढत पाकिस्तानसोबत खेळण्यावर काही निर्णय घेतले आहेत. पाकिस्तान व टीम इंडियात कधीच द्विपक्षीय मालिका होणार नाही. टीम इंडिया कधीच पाकिस्तानात खेळायला जाणार नाही आणि पाकिस्तानच्या संघांना भारतात खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे क्रीडा मंत्रालयाने जाहीर केले आहे.

हिंदुस्थानात खेळण्यास पाकिस्तान, ओमानचा नकार

पाकिस्तान आणि ओमान या देशांनी हिंदुस्थानमध्ये होणाऱया पुरुषांच्या आशियाई चषक हॉकी स्पर्धेतून मंगळवारी अधिकृतपणे माघार घेतली आहे. त्यांच्या जागेवर आता बांगलादेश आणि कझाकिस्तान या संघांना संधी देण्यात आली आहे. पाकिस्तान हॉकी फेडरेशनने सुरक्षेच्या कारणांचा हवाला दिला होता, मात्र केंद्र सरकारने पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा मंजूर केला होता.