Video वोट चोर, गद्दी छोड! संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आज विरोधकांच्या घोषणाबाजीने चांगलाच गाजला. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा लोकसभेत आले तेव्हा विरोधकांनी मोदींसमोर वोट चोर, गद्दी छोड! अशा जोरदार घोषणा दिल्या. बराच वेळ हा गोंधळ सुरू होता.

बिहारमधील SIR वर चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र लोकसभा अध्यक्षांनी ही मागमी मान्य केली नाही. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा लोकसभा सभागृहात आले तेव्हा विरोधी खासदारांनी एकत्र येत वोट चोर, गद्दी छोड!, लोकशाहीची हत्या करणारे अशा जोरजोरात घोषणा दिल्या. विरोधी खासदार घोषणा देत असतानाच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याची घोषणा केली.