
Asia Cup 2025 पूर्वीच संजू सॅमसनने टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवची डोकेदुखी वाढवली आहे. सध्या सुरू असलेलेल्या केरला क्रिकेट लीगमध्ये संजू सॅमसनने खोऱ्याने धावा काढल्या आहेत. रविवारी (24 ऑगस्ट 2025) झालेल्या सामन्यात त्याने दममदार शतक ठोकलं होत. तर मंगळवारी (26 ऑगस्ट 2025) सुरू असलेल्या सामन्यात सुद्धा त्याने विस्फोटक फलंदाजी केली आहे. अवघ्या काही धावांनी त्याचे शतक हुकले असले तरी त्याने आशिया चषकासाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे.
संजू सॅमसन सध्या केरला क्रिकेट लीगमद्ये कोच्ची ब्लू टायगर्स संघाकडून खेळत आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याचा खेळ पाहता आला नाही. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरल्यामुळे पहिल्या सामन्यात त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही तर, दुसऱ्या सामन्यात 22 चेंडूंमध्ये फक्त 13 धावा त्याला करता आल्या. परंतु तिसऱ्या सामन्यात त्याने सलामीला येत चौफेर फटकेबाजी केली आणि 51 चेंडूंमध्ये 14 चौकार आणि 7 उत्तुंग षटकारांच्या मदतीने त्याने 121 धावांची वादळी खेळी केली. त्यानंतर मंगळवारी (26 ऑगस्ट 2025) तो पुन्हा एकदा सलामीला आला आमि त्याने 46 चेंडूंमध्ये चार चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 89 धावा चोपून काढल्या. 11 धावांनी त्याचे शतक हुकले.
आशिय चषकासाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघात संजू सॅमसनची निवड करण्यात आली आहे. अशातच त्याने आता धमाकेदार प्रदर्शन करत अंतिम 11 साठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सुद्धा नक्कीच कोणाला खेळवायचं आणि कोणाला नाही? या पेचात पडला असेल.