टिटवाळा-आंबिवली दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

टिटवाळा-आंबिवली स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत इंजिन दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. कसारा ते कल्याणदरम्यान अप मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. कल्याण ते सीएसएमटी लोकल वाहतुकीवरही परिणाम झाला असून, डाऊन मार्गावरील लोकल वाहतूकही 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे.

ऐन सणासुदीत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. दरम्यान, मालगाडीचे इंजिन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.