
- फ्रीजमधील रबर स्वच्छ न केल्यास त्यावर घाण साचून तो काळा पडतो. कालांतराने रबर तुटतो किंवा फाटतो. रबर स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात थोडे डिशवॉशिंग लिक्विड किंवा व्हिनेगर घाला. त्यात मऊ कापड किंवा स्पंज भिजवून रबर स्वच्छ करा.
- रबर सैल झाला असेल, तर त्याला गरम पाणी लावा किंवा हेअर ड्रायरच्या मदतीने हळू हळू गरम करा. यामुळे रबर लवचिक होईल आणि जुन्या जागी व्यवस्थित बसेल. जर रबर तुटला किंवा फाटला असेल, तर तो बदलावा. यासाठी एखाद्या सर्विस सेंटरशी संपर्क साधू शकता किंवा तुम्ही स्वतःही रबर बदलू शकता.