सिडको जमीन घोटाळ्याची एसआयटी चौकशी

राज्यातील सरकारी वनजमिनी बळकावल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने विशेष चौकशी पथक (एसआयटी) नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा समावेश असलेल्या नवी मुंबईतील पाच हजार कोटींच्या सिडको जमीन घोटाळ्याचीही चौकशी होणार आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्य सचिवांची भेट घेत एसआयटी चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर वन विभागाने एसआयटीची स्थापना केली. या प्रकरणातील दुसऱ्या नंबरचा आरोपी बिवलकर हा देश सोडून पळण्याच्या प्रयत्नात असून तत्पूर्वीच त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस काढून त्याला अटक करणे गरजेचे आहे, अशी मागणीही त्यांनी केली.