सोने एका दिवसात 5080 रुपयांनी वाढले

सोन्याच्या दराने मंगळवारी मोठी उसळी घेतली. दिल्लीत सोन्याच्या दर 5080 रुपयांनी वाढ होऊन प्रति तोळा 1.12 लाख रुपयाच्या रेकॉर्ड स्तरावर पोचला. सोन्याच्या किमतीत एका महिन्यात प्रति तोळा सुमारे 11 हजार रुपये वाढ झाली. गेल्या एका वर्षात सोन्याच्या दरात 45 टक्के वाढ झाली. चांदीची किंमतही 2800 रुपयांनी वाढून प्रति किलो 1,28,800 रुपये झाली.