
ठाणे-वाशी लोकलमध्ये सीटवरून दोन प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही प्रवाशांनी एकमेकांच्या थोबाडात मारले. ठाणे-वाशी लोकलच्या द्वितीय श्रेणीच्या डब्यात बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीटवरून दोघा प्रवाशांमध्ये सुरवातीला वाद झाला. हळूहळू वाद विकोपाला गेला आणि दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. अखेर सहप्रवाशांनी हस्तक्षेप करत दोघांनाही शांत केले. हाणामारीची ही घटना एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओत एक टी-शर्ट घातलेला व्यक्ती आणि गुलाबी शर्ट घातलेला व्यक्ती एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. इतर प्रवाशांनी हस्तक्षेप करून त्यांना शांत राहण्याची विनंती केली.