गहू, नाचणी, ज्वारी आणि बाजरी… कोणत्या ऋतूत काय खायला हवे?

चपाती किंवा भाकरी हा आपल्या जेवणातील एक प्रमुख अन्नपदार्थ आहे. दररोज आपण सर्वजण दिवसातून एकदा भाज्यांसोबत चपाती किंवा भाकरी खातो. यामध्ये बहुतेक लोक गव्हाची चपाती खातात. परंतु वेगवेगळ्या धान्यांपासून बनवलेली चपाती किंवा भाकरी ही आपल्या आरोग्यासाठी कायम उत्तम मानली जाते. जसे की मधुमेहाच्या रुग्णांना मल्टी ग्रेन पीठापासून बनवलेली भाकरी खाण्याचा सल्ला दिला जातो.

तूप की तेल? आपल्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम काय, जाणून घ्या

कोणतीही धान्ये ही कशी आणि कोणत्याही सीझनमध्ये खायला हवी यालाही काही नियम आहेत. कारण या प्रत्येक धान्यामध्ये वेगवेगळे पोषक घटक असतात. म्हणून हे सर्व आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत आणि ते तुमच्या शरीराच्या गरजेनुसार आहारात समाविष्ट केले पाहिजेत. बाजरी, गहू, ज्वारी आणि नाचणी कधी आणि कोणत्या सीझनमध्ये खायला हवी याचेही काही नियम आहेत.

गहू – उर्जेचा आणि कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्रोत आहे. त्यात प्रथिने, चांगल्या प्रमाणात फायबर, लोह आणि व्हिटॅमिन-बी कॉम्प्लेक्स असतात. ते पचन सुधारण्यास मदत करते. थंड आणि सामान्य हवामानासाठी ते चांगले मानले जाते. ग्लूटेनची ऍलर्जी असलेल्यांसाठी गहू हा हानिकारक मानला जातो. म्हणूनच गहू अधिक प्रमाणात खाल्ल्यास लठ्ठपणा येऊ शकतो आणि रक्तातील साखर वाढू शकते.

Cooking Tips – साऊथ इंडियन पदार्थ बनवताना ‘या’ चुका टाळा

नाचणी – कॅल्शियम आणि लोह नाचणीमध्ये मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे ते हाडांसाठी फायदेशीर आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते चांगले आहे. ते पचनाला हलके असते आणि भूक नियंत्रित करण्यास मदत करते. परंतु ते जास्त खाल्ल्याने पोट जड वाटू शकते. याशिवाय कमकुवत पचन असलेल्या लोकांना गॅसची समस्या उद्भवू शकते. उन्हाळा आणि पावसाळ्यात नाचणी खाणे उत्तम मानले जाते.

ज्वारी – ज्वारीचा थंड प्रभाव असतो. हे ग्लूटेन-मुक्त धान्य आहे. म्हणून ग्लूटेन ऍलर्जी असलेल्या लोकांसाठी ते एक चांगला पर्याय मानले जाते. त्यात फायबरचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे ते बद्धकोष्ठतेपासून आराम देऊ शकते. ते हृदय आणि रक्तातील साखरेसाठी फायदेशीर आहे. ज्वारीचे सेवन अधिक केल्यास पचनक्रिया मंदावते. म्हणूनच उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सेवन करणे चांगले मानले जाते.

नेपाळमधील प्रसिद्ध पदार्थ ज्यांचे वेड हिंदुस्थानातील नागरिकांनाही आहे, वाचा

बाजरी – बाजरीमध्ये लोह, मॅग्नेशियम आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. हिवाळ्यात बाजरी शरीराला ऊर्जा आणि उबदारपणा देते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि हाडांसाठी बाजरीचे पीठ हे खूप फायदेशीर मानले जाते. बाजरीचे सेवन अधिक प्रमाणात केल्यास, बद्धकोष्ठता किंवा आम्लता होऊ शकते. उन्हाळ्यात ते जास्त सेवन केल्याने शरीरात उष्णता आणि पित्त वाढू शकते. थंड हवामानातही बाजरी योग्य प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.

प्रत्येक धान्याचे स्वतःचे फायदे आहेत. प्रत्येक व्यक्तीने ते आपल्या शरीराच्या गरजेनुसार आणि संतुलित पद्धतीने सेवन केले पाहिजे. ऋतू आणि शरीराची प्रकृती लक्षात घेऊन अन्न सेवन केले पाहिजे. जर गोष्टी संतुलित प्रमाणात घेतल्या गेल्या तरच त्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.