दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी, पोलिसांची धावपळ

दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे हायकोर्ट आणि परिसर मोकळा करण्यात आला आहे. पोलिसांनी हायकोर्टात धाव घेतली असून बॉम्ब शोधक आणि बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाच्या मदतीने बॉम्बचा शोध सुरू आहे.

शुक्रवारी दुपारी दिल्ली हायकोर्टात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई-मेल मिळाला होता. त्यानंतर थोड्याच वेळाने मुंबई हायकोर्टातही बॉम्ब ठेवण्याचा ई-मेल आला. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून कोर्ट परिसर रिकामा करण्यात आला आणि न्यायाधीश, वकिलांना चेंबर बाहेर काढण्यात आले.

मुंबई हायकोर्टात बॉम्ब स्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे हायकोर्ट आणि परिसर रिकामा करण्यात आला आहे. तसेच न्यायाधीश, वकील, सर्व पक्षकारांनाही बाहेर काढण्यात आले आहे. पोलीस तपास करत असून दोन तीन तासात सर्व ठीक होईल असे वाटते. पोलीस तपास सुरू असून धमकी आहे की अफवा हे स्पष्ट होईल, असे महिला वकील मंगला यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.