आपल्या लोकांचे रक्त सांडवणाऱ्या देशासोबत का खेळायचे? नाना पाटेकर यांचा संताप

आशिया कपमध्ये टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळवल्या जाणाऱ्या सामन्याला संपूर्ण देशातून विरोध होत आहे. या सामन्यावरून देशभरातील जनता केंद्र सरकारवर टीका करत आहे. यातच आता प्रसिद्ध अभिनेते नाना पाटकेर यांनी देखील आपल्या देशवासियांचे रक्त सांडवणाऱ्या देशासोबत का क्रिकेट खेळायचे, असा संताप व्यक्त केला आहे.

नाना पाटेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भूमिका मांडली आहे. आजच्या सामन्याविषयी पत्रकारांनी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, हिंदुस्थानने पाकिस्तानसोबत हा सामना खेळायला नको होता. मला वाटतं आपल्या देशवासियांचे रक्त सांडवणाऱ्या देशासोबत का क्रिकेट खेळायचे? असा सवाल त्यांनी यावेळी केला.