न्यूयॉर्कच्या गव्हर्नरचा ममदानी यांना पाठिंबा

न्यूयॉर्क सिटीच्या आगामी महापौर निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कैथी होचुल यांनी डेमोक्रेटिकचे उमेदवार आणि हिंदुस्थानी वंशांचे जोहरान ममदानी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. न्यूयॉर्कवासीयांनी ममदानी यांना मतदान करावे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. ममदानी यांना आतापर्यंत मिळालेला सर्वात महत्त्वाचा आणि मोठा राजकीय पाठिंबा मानला जात आहे. गव्हर्नर कैथी होचुल यांनी एका वृत्तमानपत्रात लेख लिहून आपला पाठिंबा जाहीर केला आहे.