
शिवसेना आणि रेल कामगार सेनेच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत मध्य रेल्वेच्या अनेक कामगारांनी रेल कामगार सेनेमध्ये प्रवेश केला. कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी रेल कामगार सेना वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे रेल कामगार सेनेमध्ये ‘इनकमिंग’ काढून संघटनेची ताकद वाढली आहे.
रेल कामगार सेना अध्यक्ष, शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ येथे रेल कामगार सेना भुसावळ मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीला भारत शर्मा, राजू पवार, ललित मुथा, राजेश लखोटे, प्रीतम टाक, विनोद वाघे, संतोष देशमुख, पंकज ठाकरे, मनोज गावंडे, अरविंद थोरात, निरंजन राऊत, भरत शर्मा, मुकेश महाजन, कमलाकर बनाईत, रमेश मराठे, गौतम कुमार, प्रदीप भुसारे, मंगेश शेलोडे, एल. टी. आबदने, सुनील सोनकणे, जितेंद्र धाके हे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सुकेश कुमार, शुभम भदाणे, नितीन अमरोही, मनोज यादव, सिद्धार्थ सोनवणे, अरुण पाटील, अजय नरवाडे, रणजित कुमार, मधुकर गायकवाड, योगेश भोई, राहुल खळसे, किरण तायडे, विक्रांत वानखेडे, संदीप कुमार कांबळे, दिनेश ब्राम्हणे आदींनी रेल कामगार सेनेमध्ये प्रवेश केला. या सर्व कामगारांचे रेल कामगार सेनेतर्फे स्वागत करण्यात आले.