
श्रीमंत व्यक्ती महागडी दारू पित असतील, असा समज सर्वसामान्यांचा आहे. परंतु, देशातील 34 टक्के श्रीमंत व्यक्ती कोणत्याही प्रकारची दारू पित नाहीत, अशी माहिती एका सर्व्हेतून समोर आली आहे. मर्सिडीज-बेंज हुरून इंडिया लक्झरी कंज्युमर सर्व्हे 2025 ने केलेल्या सर्व्हेतून ही माहिती उघड झाली आहे. देशातील 34 टक्के श्रीमंत लोक दारूला हात लावत नाहीत. तर 32 टक्के श्रीमंत लोकांना व्हिस्की पिणे पसंत आहे. 11 टक्के लोक रेड वाईन तर 9 टक्के लोक शॅम्पेन पिणे पसंत करतात. देशात सर्वात जास्त दारूवर खर्च करणाऱया राज्यांमध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याचा नंबर लागतो. आंध्र प्रदेशात एक व्यक्ती सरासरी दारूवर वार्षिक 620 रुपये खर्च करतो.