
उद्या 22 सप्टेंबर 2025 रोजी या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण दिसणार आहे. ज्यावेळी सूर्यग्रहण लागणार आहे त्यावेळी हिंदुस्थानात रात्रीचे 1 वाजून 22 मिनिटे झालेले असतील. त्यामुळे हे सूर्यग्रहण हिंदुस्थानात दिसणार नाही. देशात यामुळे सूतक काळ लागू होणार नाही. म्हणजेच शुभकार्यावर कोणताही अडथळा नाही. अंटार्कटिका, न्यूझीलंड, दक्षिण प्रशांत क्षेत्र आणि ऑस्ट्रेलियातील काही भागात हे सूर्यग्रहण दिसणार आहे.