
स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी समाजमाध्यमांवर धार्मिक तेढ निर्माण करणाऱया आणि शिवसेनेबद्दल दिशाभूल करणाऱया पोस्ट करणाऱया ‘भाजपा येणार मुंबई घडवणार’ या पेजविरोधात शिवसेनेकडून सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
‘भाजपा येणार मुंबई घडवणार’ या पेजवरून करण्यात येणाऱया खोडसाळ पोस्टविरोधात ईशान्य मुंबईचे विभागप्रमुख तुकाराम (सुरेश) पाटील यांनी मुंबई सायबर सेल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावेळी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांच्यासह मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.