
कधीकधी छोटय़ा मुलांमध्ये अचानक तिरळेपणा दिसू लागतो. हे नेमके कशामुळे होते. याचा उलगडा पालकांना होत नाही. ते घाबरून जातात. परंतु, असे जर तुमच्या मुलाला होत असेल तर घाबरून जाऊ नका. याला स्ट्रबिस्मस असे म्हणतात. याच्यावर योग्य वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. लक्षणे दिसल्यास तात्काळ मुलाला डोळ्यांच्या तपासणीसाठी नेत्र तज्ञांची भेट घ्यावी.
वेळेवर उपचार केल्यास दृष्टीदोष टाळता येतो. डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी आणि डोळे सरळ ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रिस्क्रिप्शन लेन्सचा वापर करावा. यावर स्वतःहून किंवा कुणाच्या सांगण्यावरून कोणताही घरगुती उपचार मुलावर करू नये. कारण, डोळे हा अत्यंत नाजूक भाग आहे. त्यामुळे डोळ्यांच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार यावर उपचार करावा.