
अर्जेंटिनाचा जगद्विख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. तत्पूर्वी मेस्सी याने स्वतः स्वाक्षरी केलेला फुटबॉल फडणवीस यांना भेट म्हणून पाठवला आहे. राज्यातील 14 वर्षांखालील तरुण फुटबॉल खेळाडूंची निवड महाराष्ट्र क्रीडा विभाग, ‘मित्रा’ आणि ‘वायफा’ यांच्याकडून केली जाणार आहे. त्या खेळाडूंना 14 डिसेंबर रोजी मेस्सीसोबत सराव करण्याची संधी मिळणार आहे. फुटबॉलसह मेस्सी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर विराट कोहली, रोहित शर्मा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासोबत क्रिकेट सामनाही खेळणार आहे.