महाराष्ट्र हितासाठी होणार गर्जना ठाकरेंची! शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याचा टीझर लाँच

महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असलेला शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी 2 ऑक्टोबर रोजी मोठय़ा दिमाखात शिवतीर्थावर होणार आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. या मेळाव्याचा पहिला टीझर आज शिवसेनेकडून लाँच करण्यात आला आहे.

शिवसेनेकडून दरवर्षी मुंबईतील शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित करण्यात येतो. या मेळाव्यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येत शिवसैनिकांसह अनेकजण विचारांचे सोने लुटण्यासाठी येतात. या मेळाव्यातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहे. शिवतीर्थावरील या दसरा मेळाव्याला मुंबई महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहेत. त्यामुळे शिवतीर्थावर दसऱ्याला 2 ऑक्टोबर रोजी शिवसेनेचाच आवाज घुमणार आहे.