Photo – पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते पोलिसांच्या गुणवंत मुलांचा सत्कार

मुंबई पोलीस दलातील अंमलदारांच्या गुणवंत मुलांना सोमवारी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रभाकर पवार यांच्या जन सहयोग फाऊंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा हा गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला दक्षिण मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख आणि मुंबई क्राईम ब्रँचच्या विशेष शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

(फोटो – रुपेश जाधव)