कोस्टल रोडवर लॅम्बोर्गिनी कारचा भीषण अपघात, गौतम सिंघानियांकडून व्हिडीओ प्रसारित

कोस्टल रोडवर वेगात असलेल्या लॅम्बोर्गिनी या आलिशान कारचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. चालकाचा ताबा सुटल्याने कार दुभाजकाला धडकली. कारच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले, पण चालकाला काही झाले नाही. याप्रकरणी वरळी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी या अपघाताचा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर पोस्ट केला आहे. रविवारी सकाळी 9.30 च्या सुमारास लॅम्बोर्गिनी कार कोस्टल मार्गावरून सुसाट निघाली होती. पण हा वेग चालकाला हाताळता आला नाही आणि कार दुभाजकावर जाऊन आदळली. अपघाताचा थरार चित्रित झाल्याने तो समोर येऊ शकला. वरळी पोलिसांनी गाडीच्या चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 सोबतच भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम 281, 125, 324(4) नुसार गुन्हा दाखल केला आहे.