मोदींनी परराष्ट्र धोरणाला कणा मिळवून दिला! अमित शहा यांचा दावा

शेजारी राष्ट्रांशी संबंध सुरळीत नसताना आणि अमेरिका आर्थिक नाकाबंदी करत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाची स्तुती केली आहे. मोदींनी देशाच्या परराष्ट्र धोरणाला कणा मिळवून दिला, असा दावा शहा यांनी केला.

एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. ‘पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे काम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह आजवरच्या सर्व पंतप्रधानांपेक्षा उजवे आहे. इतिहासकारही त्यांच्याच पारड्यात मत टाकतील,’ असे शहा म्हणाले. कलम 370, ट्रिपल तलाक, राम मंदिर असे विषय मोदींच्या काळात मार्गी लागले. 25 कोटी लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढले, हिंदुस्थानची अर्थव्यवस्था 11 वरून चौथ्या क्रमांकावर गेली, असाही दावा त्यांनी केला.