
लातूर शहरातील गंजगोलाई आणि बस स्थानक परिसरात लोखंडी कोयता आणि छर्ऱ्याची पिस्तूल घेऊन फिरताना एका युवकाला अटक करण्यात आली. गांधी चौक हद्दीमधील बसस्थानक व गंजगोलाई परिसरामध्ये एक तरुण लाल रंगाच्या मोटार सायकलवर फिरत पिस्तूल आणि लोखंडी कोयत्याचा धाक दाखवत न सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवत फिरत होता.
गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून फारूक इब्राहिम शेख (वय 36, राहणार वीरहनुमंतवाडी, कव्वा नाका) याला ताब्यात घेतले.त्याच्या जवळील यामाहा R-15 या मोटारसायकलवर बसून हातात छऱ्याची पिस्तूल व कमरेला असलेला लोखंडी धारदार कोयता बाळगून घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवत होता. पोलीस ठाणे गांधी चौक लातूर येथे गुन्हा नंबर 432/25 कलम 270 बीएनएस 4,5 आर्मएक्ट, 135 बीपी एक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक गणेश चित्ते,अमर केंद्रे, निखिल पवार, पोलिस अंमलदार रवीसन जाधव, संतोष गिरी,सचिन चंद्रपाटले,शिवा भाडुळे, बेंबडे यांनी केली.